शुक्रवारी आयपीएलच्या खेळाडूंचा लिलाव

February 5, 2009 6:15 PM0 commentsViews: 1

5 फेब्रुवारी गोवाजगभरात आर्थिक मंदीची लाट असली तरी क्रिकेटमध्ये मात्र चलती आहे. आणि हीच चलती कॅश करण्यासाठी शुक्रवारी गोव्यात आयपीएलच्या दुस-या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. आयपीएलचे संचालक ललित मोदी यांनी गोव्यात प्रेस कॉन्फरन्स घेऊन याची माहिती दिली.आयपीएल अधिक रंगतदार करण्यासाठी यंदा स्पर्धेच्या नियमातही बदल करण्यात आलेत. आयपीएलमधून आता बॉल आऊटचा नियम रद्द करण्यात आलं आहे. यापुढे जर मॅच टाय झाली तर बॉल आऊट एवेजी निर्णायक ओव्हर खेळवण्यात येईल. तसंच हंगाम सुरू असताना यापुढे खेळाडू अदलाबदल करता येणार नाहीत. पाकिस्तानी खेळाडूंबाबतचा निर्णय अद्यापी झालेला नाही. पण त्यांच्याएवेजी तात्पुरते खेलाडू घेऊ शकतो. शुक्रवारच्या लिलावात आठ टीमना मिळून एकून 130 कोटी 59 लाख रुपयेच खेळाडूंच्या खरेदीसाठी वापरता येणार आहेत.

close