राज्यसभेवर जायला आवडेल -जोशी

October 29, 2013 3:19 PM0 commentsViews: 3027

manohar joshi 429 ऑक्टोबर : दसरा मेळाव्यातल्या नाट्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशींनी आयबीएन लोकमतला पहिली खळबळजनक मुलाखत दिली. त्यात त्यांनी ‘माझा उद्धव ठाकरेंवर राग नाही. उद्धव ठाकरेंकडून अजून बोलवणं आलेलं नाही. बोलवणं आलं नाही, तरी मातोश्रीवर जाईन असं मनोहर जोशी यांनी म्हटलंय.

 

‘दसरा मेळाव्यातला गोंधळ पूर्वनियोजित होता, गोंधळ करणार्‍यांची संख्या मर्यादित होती असंही त्यांनी म्हटलंय. दसरा मेळाव्यात लीलाधर डाकेंनी स्टेजवरुन जाण्याची विनंती केली म्हणून व्यासपीठावरुन गेलो होतो. त्यानंतर ‘मी तीन दिवस खंडाळ्याला गेलो होतो अशी माहितीही मनोहर जोशीनी या मुलाखतीत दिली आहे.

 

 

मी शिवसेना सोडणार नाही. मला राज्यसभेवर जायला आवडेल कुठूनही लोकसभेची निवडणूक लढवायला आवडेल अशी इच्छाही जोशींनी बोलून दाखवली.

 

close