नितीशकुमारांना धक्का,तिवारींनी केलं मोदींचं कौतुक

October 29, 2013 4:07 PM0 commentsViews: 1368

tiwari on modi29 ऑक्टोबर : बिहारमधल्या नालंदा जिल्ह्यात संयुक्त जनता दलाचं चिंतन शिबिर झालं पण सर्व शिबिरात प्रभाव होता भाजपचे पतंप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या रॅलीचा. जेडीयूचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी नितीश कुमार यांच्या उपस्थितीच बंड पुकारला. त्यांनी भरसभेत नरेंद्र मोदींचं कौतुक केल्यानं चांगलाच गोंधळ उडाला. तुम्हाला बडव्यांनी घेरलं असून तुम्हाला जुन्या लोकांचा विसर पडलाय असे खडेबोलही तिवारीनी नितीश कुमारांना सुनावलं.

 

नरेंद्र मोदींचं कौतुक करत तिवारी म्हणाले, मोदी कमी वेळेत एक मोठी ताकद म्हणून उभे राहिले आहे. ज्या पद्धतीने मोदींनी उंची गाठली आहे त्यांचं कौतुक झालं पाहिजे. तिवारी एवढ्यावरच थांबले नाही तर पक्षात नितीश कुमार यांनी कुणाला नेता बनू दिलं नाही. त्यांना उमेदवारी बद्दल विचारलं तर ते कोणताच उमेदवार नाही असं सरळ उत्तर देतात. मुळात नितीश कुमार यांनाच कुणी नवीन नेता उभा राहू नये असं वाटतं. आमच्या सारख्या नेत्यांना थोडी जरी प्रसिद्धी मिळाली तर एवढी जळफट कशाला करता असा टोलाही तिवारींनी लगावला.

 

 

शिवानंद तिवारी यांनी मोदींचं कौतुक केल्यानं कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ सुरू केला. तिवारींच्या विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. पक्षाच्या चिंतन शिबिरात मोदींबद्दल बोलू नका असं कार्यकर्त्यांनी त्यांना सुनावलं आणि जोरदार घोषणाबाजी केली. शिबिराच्या नंतर तिवारी माध्यमांकडे घडलेल्या प्रकारवर आपली प्रतिक्रिया दिली. आपण विरोधकाबद्दल ऐकण्याची सवय ठेवावी. मोदींबद्दल ऐवढा पूर्वग्रह ठेवण्याचं कारण नाही.आपण काय बोलतोय आणि त्याची किंमत काय द्यावी लागेल हे आपल्याला माहित आहे असंही तिवारी म्हणाले.

close