राणेंचं पुढे काय?

February 5, 2009 6:26 PM0 commentsViews: 5

5 फेब्रुवारीनारायण राणे काँग्रेसमध्ये राहाणार की जाणार ही चर्चा जरी आता थंडावली असली तरी राणेंचं पुढे काय? हा प्रश्न अजूनही कायम आहे. विलासराव मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होताच राणेंनी कंबर कसली. पण चार दिवसांच्या गोंधळानंतर मुख्यमंत्रीपद हातचं जातंय, असं दिसताच राणे यांनी पक्षनेतृत्वावरच तोफ डागली. अनेकांनी सबुरीचा सल्ला दिला पण ऐकतील तर ते नारायणराव कसले. मग काय, रितसर निलंबन आणि पुन्हा तडजोड. मग दिल्लीत आणि महाराष्ट्रात राणेंसाठी हालचाली सुरू झाल्या. आता राणे काँग्रेसमध्येच राहाणार असं वाटत होतं. पण निर्णयाला वेळ लागतोय म्हणून राणे पुन्हा अस्वस्थ झाले. आणि पुन्हा राणेंनी श्रेष्ठींच्या नावाने खडे फोडले. त्यामुळे पुन्हा हायकमांडची खप्पा मर्जी झाली. आता 'प्रहार' करून थकलेले राणे वाट बघतायत दिल्लीच्या आमंत्रणाची…

close