जागावाटपाबाबत महायुतीची आज बैठक

October 29, 2013 2:14 PM0 commentsViews: 553

Image img_186152_yuti3453_240x180.jpg29 ऑक्टोबर : शिवसेना, भाजप आणि आरपीआय या महायुतीच्या समन्वय समितीची पहिली बैठक आज होतेय. या पहिल्याच बैठकीत जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा होणार आहे.

 

आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी आरपीआयला किती जागा देणार असा प्रश्न विचारत शिवसेना आणि भाजपवर दबाव आणला होता आणि जागावाटपची बोलणी तातडीनं करा असा आग्रह ही धरला होता. ऑक्टोबरपर्यंत बोलणी न केल्यास वेगळा विचार करावा लागेल असा इशारा देत त्यांनी शिवसेना भाजपला मुदतही घालून दिली होती.

 

त्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्व प्राप्त झालंय. शिवसेनेच्या वतीने लीलाधर डाके, सुभाष देसाई आणि गजानन किर्तीकर तर भाजपच्या वतीनं प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे आणि सुधीर मुणगंटीवार आणि आरपीआयच्या वतीने अविनाश महातेकर, अर्जुन डांगळे आणि भूपेश थुलकर हे सहभागी होणार आहेत.

close