अन्यथा प्रति महिला आयोग स्थापन करू -गोर्‍हे

October 29, 2013 2:29 PM0 commentsViews: 290

nilam gorhe 329 ऑक्टोबर : गेली चार वर्षे राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद भरलं गेलं नाही. राज्य सरकारनं जर एका महिन्याच्या आत अध्यक्षांची नियुक्ती केली नाही तर प्रति महिला आयोग स्थापन करू असा इशारा शिवसेनेच्या आमदार निलम गोर्‍हे यांनी दिला.

 

अध्यक्ष नेमणूक न केल्यामुले राज्यात महिला अत्याचारासंबंधित पाच हजाराहून अधिक प्रकरणं प्रलंबित आहेत. राज्य सरकारच्या या उदासिन धोरणाचा निषेध करत निर्भया समितीच्या माध्यमातून शिवसेनेच्या आमदार निलम गोर्‍हे यांनी आज राज्यपालांची भेट घेणार आहेत.

 

दरम्यान, आमदार कपील पाटील यांच्या लोकभारती संघटनेनं मुंबईत राज्यातल्या विविध महिला संघटनांची बैठक घेतली. त्यात महिला लोक आयोग हे प्रति महिला आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय.

 

सर्व महिला संघटनांचं व्यासपीठ म्हणून हा नवा आयोग असणार आहे. महिला लोकआयोगाच्या राज्यभर जिल्हानिहाय शाखा स्थापन करण्यात येणार आहेत. प्रामुख्यानं अत्याचार पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी हा आयोग काम करणार आहे.

close