बाळासाहेबांचा पहिला स्मृतिदिन शिवाजी पार्कवर

October 29, 2013 7:41 PM0 commentsViews: 1404

Image img_228142_balasahebsmarak3563_240x180.jpg29 ऑक्टोबर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पहिला स्मृतीदिन मोठ्या प्रमाणात करण्याची योजना शिवसेनेने आखली आहे. येत्या 17 नोव्हेंबर रोजी बाळासाहेबांचा पहिला स्मृतीदिन आहे.

 

तो राज्यभरात ठिकठिकाणी साजरा न करता शिवाजी पार्कवर एकाच ठिकाणी साजरा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. तसा निरोप राज्यभरातल्या शिवसेना पदाधिकार्‍यांना दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ज्या पद्धतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाला संपुर्ण देशभरातून त्यांचे अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी एकाच ठिकाणी जमत असतात.

 

त्याच पद्धतीने बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी लाखो शिवसैनिक शिवाजीपार्कवर जिथं बाळासाहेबावर अंत्यसंस्कार झाले आणि त्याच जागेवरुन शिवसेनेची सुरूवात झाली त्या जागेला वंदन करण्यासाठी जमणार आहेत.

close