पंतप्रधान आणि मोदी एकाच व्यासपीठावर

October 29, 2013 8:18 PM0 commentsViews: 1675

pm and narendra modi29 ऑक्टोबर :  काँग्रेस आणि मोदींमध्ये आता एक नवा वाद सुरू झालाय. हा वाद आहे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या वारशाचा…अहमदाबादमध्ये मंगळवारी सरदार पटेल यांच्या भव्य म्युझिअमचं उद्‌घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला पंतप्रधान मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी दोघंही उपस्थित होते.

 

यावेळी बोलताना मोदींनी सरदार वल्लभाई पटेल देशाचे पहिले पंतप्रधान असते तर चित्र वेगळं राहिलं असतं, असा टोला काँग्रेसला लगावला. यानंतर बोलायला उभे राहिलेल्या पंतप्रधानांनीही याची चांगलीच परतफेड केली. सरदार पटेल हे काँग्रेसचे नेते होते आणि धर्मनिरपेक्ष होते, अशी सुरुवात त्यांनी केली.

 

नेहरू आणि पटेल यांच्यात मतभेद असले तरी दोघंही एकमेकांचा आदर करायचे, असं सांगताना सिंग यांनी पटेल यांच्याच एका वक्तव्याचा दाखला दिला. पटेल यांच्याबद्दलच्या या वादाला आज सकाळीच सुरुवात झाली होती. मोदींनी दिव्य भास्कर या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंडित नेहरू हे पटेल यांच्या अंत्ययात्रेत गेले नसल्याचं म्हटलं. त्यावर काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. पण, मोदींच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचं नंतर त्या वृत्तपत्रानंच स्पष्ट केलं होतं.

 

close