संतोष माने मनोरुग्ण नाही

October 29, 2013 9:01 PM0 commentsViews: 544

Image img_229132_santoshmane_240x180.jpg29 ऑक्टोबर : बेदरकारपणे एसटी चालवून नऊ जणांचे बळी घेणार्‍या संतोष मानेला मानसिक आजार नाही असा अहवाल येरवडा मनोरुग्णालयाकडून सादर करण्यात आला. न्यायमूर्ती व्ही.के.शेवाळेंसमोर हा अहवाल सादर करण्यात आला.

 

संतोष मानेचा जबाब घ्यायचा की नाही यासाठी हा अहवाल महत्त्वाचा आहे. येरवडा मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ व्ही आर भैलुमे. डॉ.एम आर बहाले, डॉ. पी एस घोरपडे,डॉ पेंडसे.यांनी मानेची तपासणी करुन अहवाल सादर केला.

 

संतोष मानेच्या वतीने त्याचे वकील धंनजय माने यांनी त्याची मानसिक चाचणी करण्यात यावी, अशी मागणी सत्र न्यायालयात केली होती. त्यानुसार ही तपासणी करण्यात आली.

close