मनोहर जोशींची संपुर्ण मुलाखत

October 29, 2013 9:59 PM1 commentViews: 1654

29 ऑक्टोबर : दसरा मेळाव्यातल्या नाट्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशींनी आयबीएन लोकमतला पहिली खळबळजनक मुलाखत दिली. त्यात त्यांनी ‘माझा उद्धव ठाकरेंवर राग नाही. उद्धव ठाकरेंकडून अजून बोलवणं आलेलं नाही. बोलवणं आलं नाही, तरी मातोश्रीवर जाईन असं मनोहर जोशी यांनी म्हटलंय.

 

‘दसरा मेळाव्यातला गोंधळ पूर्वनियोजित होता, गोंधळ करणार्‍यांची संख्या मर्यादित होती असंही त्यांनी म्हटलंय. दसरा मेळाव्यात लीलाधर डाकेंनी स्टेजवरुन जाण्याची विनंती केली म्हणून व्यासपीठावरुन गेलो होतो. त्यानंतर ‘मी तीन दिवस खंडाळ्याला गेलो होतो अशी माहितीही मनोहर जोशीनी या मुलाखतीत दिली आहे. मी शिवसेना सोडणार नाही. मला राज्यसभेवर जायला आवडेल कुठूनही लोकसभेची निवडणूक लढवायला आवडेल अशी इच्छाही जोशींनी बोलून दाखवली.

  • abhi.aby

    ek lachar , lapat manus. paishya sathi hujare giri karayala mage pudhe n baghanra ha manus.

close