शेवटच्या रणजीत सचिनची हाफ सेंचुरी

October 29, 2013 10:18 PM0 commentsViews: 670

sachin fifty29 ऑक्टोबर : आपल्या शेवटच्या रणजी मॅचमध्ये खेळणार्‍या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं शानदार हाफ सेंच्युरी ठोकलीये. हरयाणाविरुद्ध होणार्‍या मॅचमध्ये सचिन पहिल्या इनिंगमध्ये फक्त 5 रन्सवर आऊट झाला होता.

 

त्यामुळे आपल्या शेवटच्या इनिंगमध्ये सचिन काय कमाल करतोय याकडे सर्व क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलं होतं. अखेर सचिननं आपल्या चाहत्यांना निराश केलं नाही.

 

मॅचच्या तिसर्‍या दिवशी सचिननं 4 फोर ठोकत नॉट आऊट 55 रन्स केलेत. सचिनच्या या शानदार कामगिरीच्या जोरावर मुंबई टीमनं मॅचमध्ये कमबॅक केलंय. त्यामुळे आता चौथ्या दिवशी सचिन या हाफ सेंच्युरीचं रुपांतर सेंच्युरीत करत रणजी कारकिर्दीचा शेवट गोड करतोय का हे बघावं लागेल.

close