सचिनच्या रणजी कारकीर्दीचा शेवट गोड, मुंबईचा विजय

October 30, 2013 2:59 PM0 commentsViews: 397

sachin ranji by by30 ऑक्टोबर : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसाठी रणजी कारकीर्दीतला शेवट गोड ठरलाय. आपली शेवटची रणजी मॅच खेळणार्‍या सचिननं दमदार कामगिरी करत मुंबईला विजय मिळवून दिलाय.

 

लाहिली इथं हरयाणाविरुद्ध झालेल्या रणजी मॅचमध्ये मुंबईने 4 विकेट राखून विजय मिळवला, आणि या विजयात महत्वाची भूमिका बजावली ती सचिन तेंडुलकरनं..विजयासाठी 240 रन्सची गरज असताना मुंबईची 6 विकेटवर 190 रन्स अशी अवस्था झाली होती. पण अनुभवी सचिननं एका बाजूला मैदानावर तळ ठोकला आणि मुंबईला शानदार विजय मिळवून दिला. सचिन 79 रन्सवर नॉटआऊट राहिलाय.

 

विशेष म्हणजे पहिल्या रणजी मॅचमध्येही सचिन तेंडुलकर 100 रन्सवर नॉटआऊट राहिला होता. आपली शेवटची रणजी मॅच खेळणार्‍या सचिनची कामगिरी पाहण्यासाठी लाहिली स्टेडिअमवर प्रेक्षकांनीही तुफान गर्दी केली होती. हरियाणाविरुद्धच्या विजयानंतर मुंबई टीममधल्या खेळाडूंनी एकच जल्लोष केला.सचिननं सर्व खेळाडूंचे आभार मानले, तर खेळाडूंनी सचिन तेंडुलकरला उचलून जल्लोष केला.

close