संजय दत्तची दिवाळी तुरुंगात

October 30, 2013 2:13 PM0 commentsViews: 263

sanjay dutt30 ऑक्टोबर : संजूबाबाची दिवाळी येरवड्यातच साजरी होणार आहे. 1993 मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अभिनेता संजय दत्त एक महिन्याची संचित रजा संपवून येरवडा कारागृहात दाखल झालाय.

 

वैद्यकीय कारणासाठी संजयला तुरूंगातून 14 दिवसांची सुट्टी देण्यात आली होती. ही सुट्टी नंतर आणखी 14 दिवसांनी वाढवण्यात आली होती. आज रजा संपल्यामुळे संजयला येरवडा कारागृहात परतावे लागले. संजय रजेवर बाहेर आल्यानंतर मला घरच्यांसोबत शांतेत राहु द्या अपेक्षा व्यक्त केली होती. आज तुरुंगात जाताना त्याने सर्व चाहत्यांचे आणि माध्यमांचे आभार मानले.

 

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाच्या वेळेस अवैधरित्या शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा झाली आहे. मागिल आठवड्यात संजयची शिक्षा कमी करता येईल का असं मत केंद्राने राज्य सरकारला मागवलं आहे. माजी न्यायाधीश आणि प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्ष मार्केडेय काटूज यांनी राष्ट्रपतींना संजयची शिक्षा माफ करावी असं पत्र लिहलं होतं. या पत्राबाबत केंद्राने आता राज्य सरकारकडे चेंडू टोलावला आहे.राज्य सरकारनेसंजयच्या शिक्षेबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही.

close