शिवसेनेचा शिववडा वादात

February 6, 2009 5:42 AM0 commentsViews: 1

6 फेब्रुवारी मुंबईशिववडा तळला जाण्यापूर्वी वादात सापडला आहे. काँग्रेसला शिववड्याचे स्टॉल देण्यात आलेले नाही.फक्त शिवसेनेच्याच वाट्याला हा शिववडा आलाय. त्यामुळे काँग्रेस नेते नाराज झाले आहेत. शिववडा योजनेसाठी महापालिकेनं 225 स्टॉल देण्याचं कबूल केलंय. स्टॉल देताना पालिकेच्या नियमानुसार एस सी, एस टी, ओबीसी अशा मागास वर्गातील बेरोजगारांना रिझर्व्हेशन असतं. पण शिववडा स्टॉल वाटपात आरक्षण ठेवण्यात आलेलं नाही. विरोधी पक्षनेते राजहंस सिंह यांनी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचं म्हटलंय. नियमानुसार 31 टक्के आरक्षण स्टॉल वाटप करताना मिळालं पाहिजे असं राजहंस यांचं म्हणणं आहे. काँग्रेसच्या मागणीमुळे शिवसेनेनंही प्रस्तावात सुधारणा होऊ शकते असं म्हटलंय आहे.

close