ऊसदरवाढीसाठी आंदोलन पेटले

October 30, 2013 6:13 PM0 commentsViews: 234
kolhapur shugarcane

ऊसदरवाढीसाठी आंदोलन पेटले

30 ऑक्टोबर : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यंदाच्या ऊसदरासाठीच्या आंदोलनाची अखेर ठिणगी पडलीय. मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी अंतिम दर जाहीर केल्याशिवाय उसाचं कांडही तोडू देणार नाही असा इशारा दिल्यानंतर त्याचे पडसाद कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात उमटत आहेत.

कागल तालुक्यातल्या हमीदवाडा साखर कारखान्याची ऊसतोड स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रोखून धरली. आणुर या गावामधल्या तोडी बंद पाडण्यात आल्या. तर दुसरीकडे हमीदवाडा कारखान्याच्या सांगावच्या कार्यालयालाही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी टाळ ठोकलंय.

दरम्यान, ऊस दरवाढीच्या संदर्भात विविध शेतकरी संघटनांनी आंदोलनं सुरू केलंय. कोल्हापूर, कागल तसंच सांगली जिल्ह्यात आंदोलनं सुरू झालीय. रघुनाथ दादा पाटील यांच्यानेतृत्वाखालील शेतकरी संघटनेनंही आंदोलन सुरु केलंय. तसंच पुणे बँगलोर मार्गावर वाघवाडी फाट्यावर आंदोलन करण्यात आलंय. यामुळे या मार्गावर वाहतूक ठप्प झालीय.

close