आयपीएलच्या लिलावात खेळाडूंवर पैशाचा पाऊस

February 7, 2009 4:19 AM0 commentsViews: 8

6 फेब्रुवारी गोवाआयपीएलचा दुसरा हंगाम पहिल्या पेक्षा मोठा आणि भव्य होईल, अशी ग्वाही कालच आयपीएल कमीशनर ललित मोदी यांनी दिली आहे. त्यामुळे आता सगळ्यांच लक्ष आहे ते या हंगामासाठी गोव्यात होत असलेल्या लिलावावर. एकूण पन्नास खेळाडू लिलावासाठी उपलब्ध आहेत. पण त्यातले सतरा खेळाडू आठ टीम्सना मिळून विकत घेता येणार आहेत. कारण प्रत्येक टीमला विदेशी खेळाडूंचा कोटा ठरवून देण्यात आला आहे. आणि फॉरेन खेळाडूंच्या काहीच जागा टीममध्ये शिल्लक आहेत. त्यामुळे आयपीएलच्या दुस-या हंगामातला लिलाव आता रंगतदार अवस्थेत पोहोचलाय. आणि आतापर्यंतची सगळ्यात मोठी बातमी आहे की, अँड्र्यू फ्लिंटॉफ आणि केविन पीटरसन आतापर्यंतचे आयपीएलचे सगळ्यात महागडे आयपीएल क्रिकेटर ठरलेत. बंगलोर रॉयल चॅलेंजर्सनी केविन पीटरसनला तर चेन्नई सुपर किंग्जनी अँड्र्यू फ्लिंटॉफला 7 कोटी 35 लाख रुपयांना विकत घेतलंय. तर दक्षिण आफ्रिकेचा जीन पॉल ड्युमिनी मुंबई इंडियन्स टीममध्ये गेलाय. त्याच्यासाठी मुंबई टीमने 4 कोटी 65 लाख रुपयांची किंमत मोजलीय. आतापर्यंत पहिल्या टप्प्यात 4 आणि दुस-या टप्प्यात 3 खेळाडू विकले गेलेत. शॉन टेट आणि फिडेल एडवर्ड्स यांना राजस्थान रॉयल्स टीमने विकत घेतलंय.

close