जोशी X राणे

October 30, 2013 6:33 PM0 commentsViews: 500

30 ऑक्टोबर : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी आयबीएन लोकमतला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिलीय. दसरा मेळाव्याच्या नाट्यानंतर जोशी फारसं काही बोलले नव्हते. पण, ते पहिल्यांदा आयबीएन लोकमतशी दिलखुलास बोललेत. बाळासाहेबांचे आपण कधीही कान भरले नाहीत, बाळासाहेब स्वताच्या विचारानंच निर्णय घ्यायचे, असं त्यांनी या मुलाखतीत स्पष्ट केलं. छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी गटबाजीचं राजकारण सुरु केल्यानंच त्यांना जावं लागलं असं जोशी यांनी स्पष्ट केलं. तसंच माझं मुख्यमंत्रीपद घालवण्यामागे राणेंचं कारस्थान होतं, असा आरोप शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी केलाय. तर त्याला उत्तर देताना उद्योगमंत्री नारायण राणे यांनी जोशी आणि कारस्थान हे समीकरणच होतं असा पलटवार केलाय.

close