शिफारस ‘बॉम्ब’, सिलेंडर 250 तर डिझेल 5 रुपयांनी महागणार?

October 30, 2013 8:42 PM0 commentsViews: 382

Image img_216732_lpgsilender3_240x180.jpg30 ऑक्टोबर : ऐन दिवाळीच्या उत्सव तोंडावर आला असताना केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या आनंदात मिठाचा खडा टाकलाय. घरघुती गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल अडीचशे रुपयांची वाढ करण्याची शिफारस किरीट पारीख समितीने केंद्राकडे केलीय.

 

तसंच अनुदानित सिलेंडर वर्षाला 9 ऐवजी 6 देण्याचीही शिफारसही करण्यात आलीय. त्यासोबतच गरिबांसाठी रोजच्या गरजेचा अविभाज्य भाग म्हणजे केरोसिनच्या दरात चार रुपयांची वाढ करावी असंही सांगण्यात आलं आहे. ही शिफारस इथंच थांबली नाही तर डिझेलच्या दरात पाच रुपयांची वाढ करावी असंही यात सांगण्यात आलंय.

 

यासंदर्भात पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईलींकडे पारीख समितीने शिफारस केलीय. तसंच पारीख समितीने डिझेलवर 6 रुपयांची सबसिडी कमी करण्याचा सल्लाही समितीने केला. जर केंद्राने या समितीची शिफारस मान्य केली तर दिवाळीत सर्वसामान्यचं दिवाळं निघणार हे निश्चित आहे.

close