‘शादी के साईड इफेक्ट्स’ ची झलक

October 30, 2013 9:28 PM0 commentsViews: 234


‘प्यार के साईड इफेक्ट्स’ नंतर, आता ‘रॉमकॉम मुव्ही’ ‘शादी के साईड इफेक्ट्स’ घेऊन येत आहे. या सिनेमाचा नुकताच ट्रेलर लाँच करण्यात आलाय. राहुल बोस आणि मल्लिका शेरावत या जोडीचा ‘प्यार के साईड इफेक्ट्स’चा हा सिक्वल. पण यावेळी ‘शादी के साईड इफेक्ट्स’ मध्ये विद्या बालन आणि फरहान अख्तरची जोडी दिसणार आहे. आणि या सिनेमाच्या निमित्ताने, त्यांची दमदार केमिस्ट्री पहिल्यांदाच पाहण्यास मिळणार आहे. या सिक्वलमध्ये लग्नानंतर सिड आणि तृषात होणारा फॅमिली ड्रामा पाहण्यास मिळणार आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’चा मुहूर्त साधत 14 फेब्रुवारीला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

close