हरीभाऊ राठोड काँग्रेसमध्ये

February 6, 2009 12:18 PM0 commentsViews: 3

6 फेब्रुवारी आशिष दीक्षित यवतमाळचे भाजपचे बंडखोर खासदार हरीभाऊ राठोड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. भाजपनं योग्य कदर केली नसल्याचा आरोपावरून हरिभाऊ राठोड यांनी भाजपला रामराम ठोकला. हरीभाऊ भाजपच्या तिकीटावर विदर्भातल्या यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. 22 जुलैला झालेल्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी मतदानाच्या केवळ अर्ध्या तास अगोदर हरीभाऊंनी लोकसभेतून काढता पाय घेतला होता. आपण आजारी होतो, असं नंतर हरीभाऊंनी सांगितलं. पण, मतदानाला अनुपस्थित राहून काँग्रेसला मदत केल्यानं त्यांना ताबडतोब भाजपमधून काढून टाकण्यात आलं होतं. गेले सहा महिने ते राज्यभरात भटक्या-विमुक्त जमातींचे मेळावे घेत होते. काँग्रेस मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात हरिभाऊ राठोड यांनी औपचारिकपणं काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावरही भटक्या-विमुक्तांसाठी काम करत राहणार, " असं हरीभाऊ राठोड म्हणाले. " भटक्या विमुक्तांसाठी रेणके आयोगाची निर्मिती करण्यात आली आहे. तर येत्या दोन महिन्यातच रेणके आयोगावर काम करून त्याची अंमलबजावणी करणार, असल्याचंही हरीभाऊ राठोड म्हणाले. भाजपमध्ये इतर जातीच्या लोकांना चांगली वागणूक मिळत नसल्याचंही हरीभाऊ राठोड यांनी सांगितलं. हरीभाऊंच्या काँग्रेस प्रवेशामुळे भटक्या विमुक्तांची स्थिती सुधारणार नाही, असं भटक्या-विमुक्त जातींसाठी बनवण्यात आलेल्या रेणके आयोगाचे अध्यक्ष बाळकृष्ण रेणके यांनी म्हटलंय.

close