कांगारूंना धोबीपछाड, भारताचा ‘विराट’ विजय

October 30, 2013 10:51 PM0 commentsViews: 825

virat kohali30 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलियाच्या पुन्हा एकदा धावाचा डोंगर पायदळी तुटवत यंग ब्रिगेडने शानदार विजय मिळवलाय. नागपूर वन डेत टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव केलाय.

 

पहिली बॅटिंग करणार्‍या ऑस्ट्रेलियानं टीम इंडियासमोर 351 रन्सचं भलं मोठं आव्हान ठेवलं होतं. शेन वॉटसनची सेंच्युरी आणि कॅप्टन बेलीच्या धुवाँधार 156 रन्सच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा रन्सचा डोंगर उभारला होता. या बलाढ्य स्कोरचा पाठलाग करताना टीम इंडियानंही चांगली सुरुवात केली.

 

शिखर धवननं शानदार सेंच्युरी ठोकली. तर रोहीत शर्माने 79 रन्स केले. पण सेंच्युरी ठोकून धवन आऊट झाला. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीनं धवनचाच कित्ता गिरवला. कोहली तुफान फटकेबाजी करत फक्त 66 बॉल्समध्ये 18 फोर आणि 1 सिक्स ठोकत 115 रन्स केले. कोहलीला साथ मिळाली ती सुरेश रैना आणि कॅप्टन धोणीची.. या तुफानी इनिंगच्या जोरावर टीम इंडियानं सहावी वन डे जिंकत सीरिजमध्ये बरोबरी साधलीये.

close