मुजफ्फरनगरमध्ये पुन्हा दंगल उसळली, 4 ठार

October 31, 2013 2:46 PM0 commentsViews: 15

muzafarnagar roits31 ऑक्टोबर : मुजफ्फरनगरमध्ये पुन्हा एकदा दंगल उसळलीय. या दंगलीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये 4 जण ठार झालेत. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. मुफ्फरनगरजवळच्या भुदाना या ग्रामीण भागात या घटना घडल्यात. तर चौथा तरुण गंभीर जखमी झालाय.

जिल्हाधिकारी कौशल राज यांनी या बातमीला दुजोरा दिल्याचं पीटीआयच्या वृत्तात दिलंय. ज्यांचा मृत्यू झालाय ते सर्व मदत छावणीत राहत होते. या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. काही दिवसांपुर्वी मुजफ्फनगरमध्ये दंगल उसळली होती यात शेकडो जणांचा मृत्यू झाला होता. तर अनेक जण बेघर झालेत.

मुजफ्फनगरमध्ये जो भाग संवेदनशील होता त्याचा भागात बुधवारी रात्री दोन गटात वादातून दंगल उसळली. अजूनही दंगलग्रस्त पुर्वीच्या दंगलीतून सावरले नाही. मदत छावणीत दंगलग्रस्त अजूनही निवार्‍याला आहेत अशातच पुन्हा एकदा दंगल उसळल्यामुळे तणावपूर्ण वातावरण आहे.

close