कांद्याचा प्रश्न मिटला-मुख्यमंत्री

October 31, 2013 1:34 PM0 commentsViews: 16

Image img_239812_cmonreccors_240x180.jpg31 ऑक्टोबर : कांद्याच्या दरात झालेली भाववाढ ही तात्पुरती होती, आता कांद्याचा प्रश्न संपलाय असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं. ते विरारमध्ये बोलत होते. आता कांद्याचा पुरवठा वाढवणार आणि नवीन कांदा बाजारात येणार असल्याचा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

तसंच दिल्लीकरांना कांद्यांसाठी पूर्ण सहकार्य दिलं जाईल त्यांनी केलेली मागणी पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल असं सांगत साठेबाजांविरोधात कडक कारवाई करणार असल्याचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिलाय.

परतीच्या पावसामुळे नाशिक आणि राज्यभरातील कांदा उत्पादकांना मोठा फटका बसला होता. बाजारात कांदाच उपलब्ध नसल्यामुळे कांद्याचे भाव गगणाला भिडले होते. दिल्लीत कांद्याचा दर 100 रुपये प्रति किलोच्या घरात गेला होता. दिल्लीश्वरांनी नाशिकमध्ये येऊन कांद्याची खरेदी केली होती.

close