कृष्णा खोरे घोटाळ्याची होणार सीआयडी चौकशी

October 31, 2013 9:06 PM0 commentsViews: 21

krushan khore31 ऑक्टोबर : कृष्णा खोरे घोटाळ्याची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी दिले आहे.

याचिकाकर्ते पोपट कुरणे यांच्या याचिकेवरच्या सुनावणीवेळी माहिती आयुक्तांनी हे आदेश दिलेत. कृष्णा खोरे विकास महामंडळाचा घोटाळा हा शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात झाला.

हा घोटाळा काही मुठभर भ्रष्ट ठेकेदार, अधिकारी आणि राजकारण्यांच्या संगनमतातून करण्यात आला. स्वत:चं उखळ पांढरं करणार्‍या बड्या ठेकेदारांच्या सिंडिकेटनं युती सरकारला वेठीस धरून हा कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

close