सचिन देशातला सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू

October 31, 2013 10:02 PM1 commentViews: 47

sachin Tendulkar milliners31 ऑक्टोबर : रेकॉर्डचा बादशाह असलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आणखी एक रेकॉर्ड जमा झालाय. पण हा रेकॉर्ड मैदानावरच नाहीए, तर मैदानाबाहेरचा आहे.

सचिन तेंडुलकर भारतातला सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू ठरला आहे. सचिनची संपत्ती 160 मिलियन डॉलर अर्थात 10 अब्ज एवढी आहे. वर्ल्ड एक्सच्या अहवालानुसार ही आकडेवारी जाहीर करण्यात आलीय.

सचिनची संपत्ती ही धोणीच्या तिनपट आहे. धोणीची संपत्ती 50 मिलियन डॉलर इतकी आहे. भारतातल्या श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत सचिन तेंडुलकरनंतर धोणीचा नंबर लागतो. तर यानंतर युवराज सिंग, राहुल द्रविड आणि विराट कोहलींचा समावेश आहे.

  • avinash

    Mag Sachin Tendulkar sports school ka kolat nahi

close