वन कामगाराचं मुंबईत सिनेस्टाईल आंदोलन

February 6, 2009 12:56 PM0 commentsViews: 2

6 फेब्रुवारी, मुंबई राज्यातल्या वनकामगारांना नोकरीत कायम करण्याचं आश्वासन राज्यसरकारनं दिलंय. पण त्या निर्णयाची अंमलबजावणी राज्यसरकारनं केली नाहीये. त्यामुळं सध्या राज्यभरात वनकामगारांचं धरणं आंदोलन सुरू आहे. असंच एक आंदोलन मुंबईतल्या आझाद मैदानावर सुरू आहे. या आंदोलनादरम्यान चिरकूट मुडीहाल या वनकामगारानं झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. नोकरीत कायम करण्यासाठीच्या वन कामगाराच्या या फिल्मी आत्महत्येचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍याला पोलिसंनी ताब्यात घेतलंय.

close