एनडीएची आगेकूच, यूपीएची पिछेहाट

October 31, 2013 11:56 PM0 commentsViews: 11

5 stete election31 ऑक्टोबर : दिल्ली, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. या राज्यात जर आज निवडणुका झाल्या तर देशात कुणाची सत्ता येईल याच चित्र जवळपास स्पष्ट झालंय. जर आज निवडणुका झाल्या तर देशात कुणाची सत्ता येईल यासाठी आयबीएन नेटवर्क आणि द वीक यांच्यासाठी CSDS ने सर्व्हे केलाय. या सर्व्हेनुसार देशभरात एनडीएने आगेकूच केली.

एनडीएला 187 ते 195 जागा मिळतील तर काँग्रेस बॅकफूटवर गेली असून 134 ते 142 जागा काँग्रेसला मिळतील. पण या निवडणुकीत तिसरी आघाडी निर्णायक ठरणार आहे. बसपा, डावे आणि सपा यांच्या वाट्याला अपेक्षेप्रमाणे यश जरी मिळाले नाही तरी 543 जागांपैकी अर्ध्या जागा या याच पक्षांकडे असणार आहे. जर भाजपची सत्ता आली तर अपेक्षेप्रमाणे नरेंद्र मोदीच पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर विराजमान होतील. मोदींनी पंतप्रधान व्हावं असं 48 टक्के लोकांना वाटतंय.

आणि काँग्रेसची सत्ता आली तर राहुल गांधी पंतप्रधान व्हावं असं 35 टक्के लोकांना वाटतंय तर मनमोहन सिंग यांना फक्त 8 टक्के लोकांनी पसंती दिलीय. तर सोनिया गांधी यांना 10 टक्के लोकांनी पसंती दिलीय. तिसरी आघाडी जर सत्तेवर आली तर बसपाच्या अध्यक्ष मायावती पंतप्रधान व्हाव्यात असं 12 टक्के लोकांना वाटतंय तर नितीश कुमार यांना फक्त 9 टक्के लोकांनी पसंती दिली.

================================================================

1) निवडणुकीचं राष्ट्रीय चित्र – यूपीए सरकारची कामगिरी कशी आहे?
—————————————————————————————
 राज्य                                समाधानी असमाधानी
————————————————————————————–
                          जुलै         ऑक्टो.         जुलै          ऑक्टो.
————————————————————————————–
दिल्ली              30%         42%         59%          48%
राजस्थान         48%         49%        29%           36%
मध्यप्रदेश        37%         58%        35%           24%
छत्तीसगड         37%        46%         37%          22%
————————————————————————————-

================================================================

राज्य सरकारांना पुन्हा संधी द्यावी ?
——————————————————
राज्य———–      हो         नाही
—————————————————–
मध्यप्रदेश           53%     20%
छत्तीसगड            47%     25%
राजस्थान            31%      45%
दिल्ली                29%       60%
—————————————————-

================================================================

यूपीए सरकार किती भ्रष्ट आहे ?

 • * अति भ्रष्ट – 29%
 • * काहीप्रमाणात भ्रष्ट – 35%
 • * थोडं भ्रष्ट – 7%
 • * पूर्ण भ्रष्ट नाही – 5%

================================================================

काँग्रसेनं राहुल गांधींचं नाव पंतप्रधानपदासाठी जाहीर करावं?

 • मध्यप्रदेश यूपी 46%
 • दिल्ली 41%
 • राजस्थान 35%
 • छत्तीसगड 29%

================================================================

मोदींमुळे भाजपला लोकसभा निवडणुकीत मतं मिळतील ?
——————————–
राज्य                टक्के
——————————–
राजस्थान         51%
दिल्ली             49%
मध्यप्रदेश        44%
छत्तीसगड         30%
———————————

================================================================
भाजपची  सत्ता आल्यास पंतप्रधान कोण होईल ?

 • * नरेंद्र मोदी – 48%
 • * सुषमा स्वराज – 4%
 • * लालकृष्ण अडवाणी – 7%
 • * राजनाथ सिंग – 2%
 • * शिवराजसिंग चौहान – 5%
 • * अरुण जेटली – 1%

================================================================

काँग्रेसची सत्ता आल्यास पंतप्रधान कोण होईल ?

 • * राहुल गांधी – 35%
 • * डॉ. मनमोहन सिंग – 8%
 • * सोनिया गांधी – 10%
 • * शीला दीक्षित – 2%
 • * प्रियंका गांधी – 2%
 • * पी. चिदंबरम् – 3%
 • * ए. के. अँटोनी – 1%

================================================================
तिसरी आघाडी सत्तेत आल्यास कोण पंतप्रधान होईल ?

 • * मायावती – 12%
 • * नितीश कुमार – 9%
 • * ममता बॅनर्जी – 9%
 • * मुलायम सिंग – 6%
 • * नवीन पटनायक – 2%
 • * शरद पवार – 2%
 • * जयललिता – 2%

================================================================
वादग्रस्त अध्यादेशाला राहुल गांधींनी केलेल्या विरोधाबद्दल तुमचं मत काय?

 • सहमत – 30%
 • असहमत – 15%

==========================================================
मतदानाचा नकाराधिकार दिल्यास, तुम्ही काय कराल?

 • * मत देणार नाही – 7%
 • * एका उमेदवाराला मत देणार – 11%
 • * नकाराधिकाराचं बटन दाबणार – 32%
 • * पक्षाला बघून मत देणार – 33%
 • * माहीत नाही – 17%

================================================================

जागांचा अंदाज

एकूण जागा – 543

 • यूपीए – 134 ते 142
 • एनडीए – 187 ते 195
 • बसप – 15 ते 19
 • डावे – 22 ते 28
 • सपा – 17 ते 21
 • इतर – 147 ते 155

================================================================

एनडीएची आगेकूच, यूपीएची पिछेहाट
—————————————————————
पक्ष                  जुलै – 2013           ऑक्टो. 2013
—————————————————————
यूपीए              149 ते 157           134 ते 142
एनडीए           172 ते 180           187 ते 195
बसप                 15 ते 19                15 ते 19
डावे                  22 ते 28               22 ते 28
सपा                  17 ते 21               17 ते 21
इतर              147 ते 155           147 ते 155
——————————————————————

================================================================

 यूपीएच्या जागांचा अंदाज

 • * काँग्रेस – 116 ते 124
 • * काँग्रेस आघाडी – 15 ते 21

================================================================

 एनडीएच्या जागांचा अंदाज

 • * भाजप – 171 ते 179
 • * भाजप आघाडी – 13 ते 19

================================================================

इतरांच्या जागांचा अंदाज

 • * तृणमूल काँग्रेस – 23 ते 27
 • * अण्णा द्रमुक – 16 ते 20
 • * जेडीयू – 15 ते 19
 • * बिजू जनता दल – 12 ते 16
 • * वायएसआर काँग्रेस – 11 ते 15
 • * राजद – 8 ते 12
 • * द्रमुक – 8 ते 12
 • * तेलगू देसम पार्टी – 6 ते 10
 • * तेलंगणा राष्ट्र समिती – 5 ते 9
close