वाजपेयींची प्रकृती बिघडली

February 6, 2009 2:55 PM0 commentsViews: 6

6 फेब्रुवारी, नवी दिल्ली आशिष दीक्षित माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीत आणखी बिघाड झालाय. छातीत दुखत असल्यानं त्यांना गेल्या तीन तारखेला दिल्लीतल्या एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांची तब्ब्येत आणखी बिघडल्यानं त्यांना आता व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलंय. गेल्या कित्येक महिन्यांपासून वाजपेयी यांची प्रकृती बरी नाही. त्यामुळे ते लखनौमधून आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे. एम्सचे डॉ. संपत कुमार वाजपेयींवर उपचार करत आहेत. " वाजपेयींच्या श्वसन नलिकेस इजा झाल्यानं श्वासोच्छवास करण्यास त्रास होत आहे. त्यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यात वाजपेयींना न्यूमोनिआ आणि व्हायरल फिव्हर झाल्यानं प्रकृतीत गुंतागुंत झाल्याची माहिती डॉ. संपत यांनी दिली. व्हेंटिलेटरवर असणारा रुग्ण पुन्हा बरा होऊ शकतो. त्यामुळे वाजपेयींची प्रकृती सुधारेल, असा दिलासाही डॉ. संपत कुमार यांनी दिला.

close