मी तुमच्यासाठी जगेन -मोदी

November 1, 2013 7:00 PM0 commentsViews: 34

narendra modi in pune01 नोव्हेंबर : काँग्रेसने मला अडकवण्यासाठी अनेक वेळाप्रयत्न केले कधी सीबीआय कारवाई तर कधी न्यायालयातून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पण सगळ्यात ते अयशस्वी ठरले आता देव जाणे ते कोणता मार्ग निवडतील. मी तुमच्यासाठी जगेन आणि तुमच्यासाठीच हे आयुष्य समर्पित करीन असं भावनिक आवाहन भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी दिलं.

तसंच शंभर दिवसात महागाई कमी करणार असं सत्तेवर आल्यावर काँग्रेसनं आश्वासन दिलं होतं, पण महागाई कमी तर झाली नाहीच तर उलट वाढली. जरा जनतेला हिशेब द्या अशी टीका मोदी यांनी केली. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या सुपर स्पेशालिटी इमारतीचं उद्घाटन झालं यावेळी गानसम्राज्ञी लता मंगेशकर, आशा भोसले यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते.

मोदींचं पुण्यात आगमन झाल्यानंतर पुणे विमानतळावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं.यावेळी मोदींची छोटेखानी सभाही झाली. यावेळी ते म्हणाले, दिल्लीमधल्या महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरूनही त्यांनी काँग्रेसवर बोचरी टीका केली. ही लोकशाही आहे आणि या लोकशाहीमध्ये दिल्लीच्या सत्तेवर सेवक बसले पाहिजे. काँग्रेसच्या अध्यक्षा आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री, दोघी महिला आहेत. त्यांच्या राज्यातच दिल्ली हे रेप कॅपिटल झालंय, असंही मोदी म्हणाले.

close