नरकारसुराचे मुखवटे

November 1, 2013 7:09 PM0 commentsViews: 19

01 नोव्हेंबर : दिवाळी पहाटेच्या आधी रात्री बारा वाजता नरकासूर दहन करण्याची प्रथा कोकणात आहे. या नरकासुराचे वेगवेगळ्या स्वरुपातले मुखवटे तयार करण्याच्या कामाला सिधुदुर्गात सध्या वेग आलाय. कुडाळमधल्या राऊळ कुटुंबाकडे या नरकासुराच्या मुखवट्यांची वाढती मागणी आहे. विशेष म्हणजे हे सर्व मुखवटे कागदाच्या लगद्यापासून इकोफ्रेंडली असे तयार केले जातायत. कागदापासून तयार केलेल्या अशा नरकासुराच्या भव्य पुतळ्यांची स्पर्धाही दिवाळीच्या पूर्वसंध्येला सावंतवाडी आणि कुडाळमध्ये घेतली जाणार आहे.

close