बाळासाहेबांच्या स्मृती उद्यानाचं काम सुरू

November 1, 2013 7:20 PM0 commentsViews: 35

01 नोव्हेंबर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृती उद्यान शिवाजी पार्कमध्ये उभारण्यात येतंय. 17 नोव्हेंबर रोजी बाळासाहेबांचा पहिला स्मृती दिन आहे. त्यापुर्वी महापालिका उद्यानाचं बांधकाम पूर्ण करणार आहे. शिवसैनिक बाळासाहेबांना नेहमी वंदन करू शकतील, असं हे उद्यान असणार आहे. ‘शिवतीर्था’वर बाळासाहेब ठाकरे यांचा बांधकाम विरहीत बाग वजा स्मृती चौथरा उभारला जाणार आहे. शिवाजी पार्कात बांधकाम विरहीत स्मारक उभारण्याला कमिटीनं मान्यता दिलीय. 14 ऑगस्ट 2013 च्या महापालिकेच्या परिपत्रकानुसार शिवाजी पार्क परिसर हा नव्या विकास नियमावलीनुसार हेरिटेज परिसर म्हणून घोषित करण्यात आला होता. यानुसार या परिसरात कोणतंही काँक्रेटचं बांधकाम करताय येणार नव्हते. त्यामुळे शिवाजी पार्कवर मातीचा भराव टाकून स्मृती चौथरा उभारला जाणार असा प्रस्ताव मांडण्यात आला त्याला हेरिटेज कमिटीने मान्यता दिली. आता 17 नोव्हेंबर रोजी बाळासाहेबांचा पहिला स्मृती दिन आहे. राज्यात एकाच ठिकाणी बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कची निवड करण्यात आलीय.

close