मुन्नाभाई -हिरानीच्या भेटीची होणार चौकशी

November 1, 2013 7:31 PM0 commentsViews: 119

hirani meet sanjay01 नोव्हेंबर : आपल्या मुन्नाभाईला भेटण्यासाठी गेलेले दिग्दर्शक राजू हिरानी अडचणीत सापडले आहे. राजू हिरानी यांनी पुण्यातील येरवडा कारागृहात जाऊन संजय दत्तची भेट घेतली होती. या भेटीची आता चौकशी होणार आहे.

येरवडा जेलच्या अतिरिक्त संचालक मीरा बोरवणकर यांनी हे चौकशीचे आदेश दिले आहेत. जेलमधले कैदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार होते, आणि यात मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्तचाही सहभाग होता. यावेळी राजू हिरारनीनं येरवड्यात जाऊन संजय दत्त याची भेट घेतली होती.

close