26/11च्या तपासासाठी पोलिसांची टीम अमेरिकेला जाणार ?

February 7, 2009 4:46 AM0 commentsViews: 5

7 फेब्रुवारी मुंबईमुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासासाठी पोलिसांची टीम अमेरिकेला जाण्याची शक्यता आहे. या हल्ल्याचा तपास करणा-या टीममधल्या तीन अधिका-यांना अमेरिकेला जाण्याची परवानगी देण्यात यावी असा प्रस्ताव गुन्हे शाखेनं गृहखात्याला पाठवला आहे. ऍडिशनल सीपी देवेन भारती, सीनिअर पोलीस इन्स्पेक्टर अरूण चव्हाण आणि पोलीस इन्स्पेक्टर दिनेश कदम यांच्या नावांचा यात समावेश आहे. ही टीम एफबीआयशी हल्ल्याच्या तपासाच्या माहितीची देवाणघेवाण करणार आहे.

close