नरेंद्र मोदी व्हावेत पंतप्रधान,लतादीदींची इच्छा

November 1, 2013 8:39 PM2 commentsViews: 68

lataddidi on modi01 नोव्हेंबर : मी देवाकडे प्रार्थना करते जी मी अपेक्षा करतेय, तुम्ही जी अपेक्षा करताय की, नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान व्हावे अशी इच्छा गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी व्यक्त केली.

तसंच दीनानाथ मंगेशकर यांच्या नावे असलेल्या पहिल्या हॉस्पिटलचं उद्घाटन अटल बिहारी वाजपेयी यांनी केलं होतं. आज 1 नोव्हेंबर रोजी या हॉस्पिटलचं उद्घाटन मोदींच्या हस्ते झालं अशी आठवणही लतादीदींनी करुन दिली.

पुण्यामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या सुपर स्पेशालिटी इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला गानसम्राज्ञी लता मंगेशकर, आशा भोसले, पंडित हृदयनाथ मंगेशकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे या कार्यक्रमाला उपस्थित होते. याच कार्यक्रमात नरेंद्र मोदी हे पंतप्रधान व्हावेत ही इच्छा लतादीदींनी व्यक्त केली आणि मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला पाठिंबा दिला.

या कार्यक्रमापुर्वी दुपारी नरेंद्र मोदी यांचं पुणे एअरपोर्टवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं. यावेळी मोदींची एक सभाही पार पडली यावेळी मोदींनी त्यांच्या 15 मिनिटांच्या भाषणात काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसनं महागाई कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण महागाई कमी तर झाली नाहीच तर उलट वाढली, असं मोदी म्हणाले.

  • vishal

    nice…….,

  • Chandrakanth

    atadidi.. Tumhala Houspital sathi Zamin Diliy Maharastra Governmentni… Aani Gun Gatay Modiche .. He barobar Nahi..

close