नाशिकमध्ये दरोड्यात मायलेकांचा मृत्यू

November 1, 2013 9:29 PM0 commentsViews: 26

nagar daroda01 नोव्हेंबर : नाशिकमध्ये गवळानी रोडवरच्या मोंडे वस्तीत दरोडेखोरांनी टाकलेल्या दरोड्यात मायलेकांचा मृत्यू झाला आहे. दरोडेखोरांनी या दोघांवर धारदार शस्त्रांनी वार केले. या दरोड्यामध्ये दोन जण जखमी झाले.

संगीता मोरे आणि अनुप मोरे या दोघांचा घटनेत मृत्यू झालाय. तर परिवारातील एकनाथ मोरे आणि हिराबाई मोरे हे गंभीर जखमी झाले असून खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. गेल्या महिन्याभरात नाशिक शहरात चार हत्येच्या घटना घडल्या असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

close