पाटणा स्फोटातील मृतांच्या कुटुंबीयांना मोदींकडून 5 लाखांची मदत

November 2, 2013 3:53 PM1 commentViews: 26

modi 435234523502 नोव्हेंबर : पाटणा बॉम्बस्फोटातल्या बळींच्या नातेवाईकांची विचारपूस करण्यासाठी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज बिहारच्या दौर्‍यावर आहेत. गौरीचक आणि कैमूरमधल्या बळींच्या नातेवाईकांची त्यांनी भेट घेतली.

आणि त्यांना पाच लाख रुपयांचा मदतीचा धनादेश दिला. मोदींच्या या भेटीवर संयुक्त जनता दलानं टीका केलीय. मोदींना पंतप्रधान बनण्याची घाई आहे. आणि त्यामुळे भाजप ते जातीय हिंसाचाराला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप जेडीयूनं केलाय.

त्यावर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीच पीडितांचं सांत्वन करायला हवं होतं, असं उत्तर भाजपंन दिलंय. रविवारी नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या अगोदर पाटणात सहा साखळी स्फोट झाले यात सात जण ठार झालेत.

  • Dravinash Dhale

    Very nice gesture ! Now he should go ahead and visit victims of Gujarat riots too.

close