पवार निवडणूक न लढवण्याची गॅरेंटी नाही-CM

November 2, 2013 4:17 PM1 commentViews: 10

cm on pawar02 नोव्हेंबर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत हा त्यांचा निर्णय अंतिम आहे असं आताच मानणं चूक ठरेल असा संशय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.

शरद पवारांच्या उमेदवारीबाबत मार्मिक विधान करून मुख्यमंत्र्यांनी आघाडीत संभ्रमाचं वातावरण निर्माण केलंय. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

त्याचवेळी राष्ट्रवादीनं तिसर्‍या आघाडीच्या बैठकीला हजेरी लावली होती. त्या पार्श्वभुमीवर पवारांविषयीचं हे भाष्य करून मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या वर्मावर बोट ठेवल्याची चर्चा रंगली आहे.

  • Sandesh Bhagat

    Sharad Pawar yanchi swata Pawar guarantee gheu shakat nahi…. Baba

close