संघाचे विचार ऐकल्यावर लतादीदींचं मत बदलेल -ठाकरे

November 2, 2013 4:43 PM1 commentViews: 22

manikrao on modi02 नोव्हेंबर : भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे अशी इच्छा बोलून दाखवली. त्यांच्या वक्तव्यावर मात्र काँग्रेसच्या नेत्यांची चांगलीच जळफटक झालीय. काँग्रेसचे नेत्यांनी थेट भारतरत्न लतादीदींच्या वक्तव्यावर टीका करायला सुरूवात केलीय.

लोकशाहीमध्ये सर्वांना मत मांडण्याचा अधिकार आहे,बोलण्याचा अधिकार आहे. परंतू संघाच्या धोरणामुळे देशाची एकात्मता धोक्यात येणार आहे आणि लतादीदींनी याबद्दल जाणून घेतलं तर त्यांचं मत परिवर्तन होईल अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली

तर लतादीदींचं हे व्यक्तीगत मत आहे त्या काय विचार करताय हा त्यांचा प्रश्न आहे असं मत काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी व्यक्त केलं. शुक्रवारी पुण्यात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचं उद्घाटन मोदींच्या हस्ते पार पडलं यावेळी लतादीदींनी मोदी पंतप्रधान व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती.

  • ANIL RANE

    What lata didi said from bottom of heart and this is what we all common man want.

close