सिंधुदुर्गातला चावदिवस

November 2, 2013 7:14 PM0 commentsViews: 6

02 नोव्हेंबर : सिंधुदुर्गातील दिवाळी आगळीवेगळीच. दिवाळीच्या दिवसाला इथे चावदिवस म्हणतात. या दिवशी नव्या भाताच्या पिकाचे पोहे काढून ते भिजवून शेतकर्‍यांच्या घरोघरी खाल्ले जातात. आणि मगच भाताच्या पिकाचा वापर करण्यात येतो. सुदाम्याने कृष्णाला दिलेल्या पोह्यांची आठवण म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. सिंधुदुर्गात सध्या अशीच पोहे काढून घेण्याची धामधूम सुरू आहे.

close