नरकासुराचं दहन

November 2, 2013 7:20 PM0 commentsViews: 22

02 नोव्हेंबर : दुष्ट शक्तींचं प्रतिक मानलं गेलेल्या नरकासुराच्या पुतळ्याचं दहन करून आणि घराघरासमोर तुळशी वृदांवनासमोर कारीटं फोडून सिंधुदुर्गातल्या दिवाळीला सुरूवात झालीय. काही हौशी तरूणांनी मुंबई-गोवा महामार्गालगत नरकासुराचे चित्र विचित्र पुतळे उभे केले होते. आज पहाटे पाच वाजता या सर्व पुतळ्यांचं दहन करण्यात आलं. सावंतवाडी आणि कुडाळमध्ये नरकासूर साकारण्याची स्पर्धाही यावेळी घेण्यात आली. नरकासूर दहनानंतर प्रथेनुसार गोविंदा गोपाळाच्या गजरात तुळशी वृंदावनासमोर कारीटं फोडून दिवाळीला सुरूवात झाली.

close