भव्य रांगोळी

November 2, 2013 7:23 PM0 commentsViews: 331

02 नोव्हेंबर : दिवाळी म्हणजे आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती लखलखत्या दिव्यांची आरस, झगमगते आकाश कंदील आणि दारासमोर काढलेल्या सुंदर रांगोळ्या. या रांगोळ्यांचे उठावदार रंग कोणाच्याही मनाला भुरळ घालतात, अशीच एक मुंबईच्या भांडुप भागात भव्य रांगोळी भांडूप पुर्वेच्या दातार कॉलनीत गणेश मंदिर ट्रस्टच्या वतीने काढण्यात आली आहे. ही रंगोळी कार्यकत्यांनी अख्खी रात्र जागून काढलीय. 400 स्क्वे.फूट एवढी प्रचंड ही रांगोळी आहे. या रांगोळीसाठी 12 रंग छटा मिळून 12 किलो रांगोळी आणि 7 किलो रंग छटा वापरण्यात आलेला आहे.तब्बल 7-8 तास या रांगोळीसाठी लागले असून मंदिराच्या अनेक भक्तांनी एकत्र येउन हि रांगोळी काढलेली आहे.

close