सीएसटी स्टेशनवर पुन्हा गोळीबार

February 7, 2009 7:08 AM0 commentsViews: 6

7 फेब्रुवारी मुंबईशनिवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास सीएसटी स्टेशनवर पुन्हा एकदा गोळीबार झाला. सीएसटी रेल्वे स्टेशनवर पहाटे एक व्यक्ती संशयास्पद अवस्थेत फिरत होता. त्याला पोलिसांनी हटकले असता या तरुणाने आपल्या रिव्हॉल्व्हरमधून पोलिसांवर गोळी झाडली.आणि तो प्लॅटफॉर्म 11च्या दिशेने पळून गेला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलं चौकशीत या तरुणाचं नाव राजेश तोमर असल्याचं उघडकीस आलं आहे. राजेश हा मुंबईमधल्या वडाळयाचा रहिवासी आहे. पोलिसांनी त्याच्यावर खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला आहे. याच ठिकाणावर काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. सध्या राजेश तोमर पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्याकडून मेटल बॉडीच्या देशी कट्टयाबरोबर 2 जिवंत काडतूसही जप्त करण्यात आली आहेत.

close