मतदानपूर्व जनमत चाचणीवर निर्बंध आणा – काँग्रेस

November 3, 2013 3:32 PM1 commentViews: 39

Image congress_aajcha_sawal_300x255.jpg3 नोव्हेंबर : २०१४ च्या निवडणुकीमध्ये  काँग्रेसच्या जागा कमी होतील असे भाकीत  मतदानपूर्व जनमत चाचणीत (ओपिनियन पोल) वर्तवले जात असल्याने बिथरलेल्या काँग्रेसने ओपिनियन पोलवर निर्बंध आणा अशी मागणी निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे.

 

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून काँग्रेस व भाजप दोन्ही पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी दोन्ही पक्ष सोडत नाही. ओपिनियन पोलमध्येही काँग्रेसच्या जागा कमी होती असे दिसून येते.
सीएनएन आयबीएन आणि द वीकने केलेल्या सर्वेक्षणात काँग्रेसला कमी जागा मिळेल व भाजपला बहुमत मिळेल असे दिसून आले होते.  यूपीए निवडणुकीत अवघ्या १३४ ते १४२ तर एनडीएला १८७ ते १९५ जागा मिळतील असे दिसून आले होते. मात्र यामुळे काँग्रेसच्या गोटात नाराजी पसरली आहे.
काँग्रेसने निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवले असून या पत्रात ओपिनियन पोलवर निर्बंध आणा अशी मागणी करण्यात आली आहे. ‘अशा प्रकारच्या सर्वेक्षणाची विश्वासार्हता नसते आणि त्यामुळे त्याचा गैरवापर होण्याची शक्यता जास्त असते असे या पत्रात म्हटले असून ओपिनियन पोलवरील निर्बंधांसंदर्भात आयोगाने सर्व राजकीय पक्षाची चर्चा करावी अशी मागणीही काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

 

सीएनएन – आयबीएन व द वीकचे सर्वेक्षणाचा अंदाज
 
एकूण जागा – 543
यूपीए – 134 ते 142
एनडीए – 187 ते 195
बसप – 15 ते 19
डावे – 22 ते 28
सपा – 17 ते 21
इतर – 147 ते 155
  • bhausaheb khedekar

    जनतेचा हक्क हे सरकर हाळू हाळू काढून घेत आहे

close