इस्त्रोच्या मंगळवारीचे काउंटडाऊन सुरु

November 3, 2013 2:10 PM0 commentsViews: 30

mars13 नोव्हेंबर :

संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या इस्त्रोच्या मंगळवारीचा काउंटडाऊनला सुरुवात झाली आहे.  ५ नोव्हेंबर (मंगळवारी)दुपारी दोन वाजून ३६ मिनीटांनी इस्त्रोचे मंगलायन अंतराळाच्या दिशेने प्रस्थान करेल.  या अवकाशयानात अंतराळवीर नसतील.
इस्त्रोने मंगलायन या मंगळ मोहीमेतून अंतरिक्ष क्षेत्रात कर्तुत्वाचा ठसा उमटवला असून या मोहीमेतून इस्त्रोला मंगळावरील महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध होणार आहे.अत्यंत किचकट पण महत्त्वपूर्ण असलेली ही मोहीम यशस्वी व्हावी यासाठी इस्त्रोचे सदस्या अथक मेहनत घेत आहेत.
दरम्यान इस्त्रोच्या मोहीमेला अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक असतानाच नासाच्या मार्स वन या मंगळ मोहीमेला भारतीयांनीही भरभरुन प्रतिसाद दिला आहे. या मोहीमेत सर्वसामान्यांना मंगळावर जाण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
२०२३ मध्ये ही मोहीम होणार असली तरी मोहीमेच्या नोंदणीसाठी भारतातील तब्बल आठ हजार जणांनी अर्ज केला आहे.  ‘मंगळावरचा पृष्ठभाग नेमका कसा दिसतो, मंगळावर पाणी असेल का अशी अनेक प्रश्न जितेन खन्ना या तरुणाच्या मनात निर्माण झाली आहे. मंगळाबद्दल खूप काही जाणून घेण्यासाठी इच्छूक असलेल्या जितेनला आता नासाच्या पुढील घोषणेची प्रतिक्षा आहे.
यात मार्स वनच्या निवडप्रक्रियेच्या पुढच्या फेरीत निवड झालेल्यांची नावे जाहीर करण्यात येणार आहे. ‘मंगळावारीसाठी निवड झाल्यास माझ्या आयुष्यात बदल होईल. पृथ्वीवर मुबलक पाणी असल्याने आपण सर्रास पाण्याचा वापर करतो. मात्र तिथे पाणी नसल्याने ओल्या टीश्यू पेपरवर समाधान मानावे लागेल असे तो सांगतो.
मंगळवारीची ओढ माणिकनंदनलाही लागली आहे. माणिक हा अग्निप्रतिबंधक उपकरणांचा वितरक असून नासाच्या मार्स १ साठी नोंदणी केलेल्यांमध्ये त्याचाही समावेश आहे. ‘मी या मोहीमेत नाव नोंदवले असता अनेक जण माझ्यावर हसत होते. मी वेडा झालोय असदेखील काही जण म्हणाले. पण मी वेडा असेन तर २ लाख २ हजार लोकांनी नोंदणी केली केली आहे. ते सर्व जण वेडे आहेत का असा सवाल माणिकनंदन विचारतो.
माझी निवड झाली तर सगळंच बदलून जाईल. उदाहरणार्थ आपण सगळेच जण पाण्याचा वापर करतो. पण मला तिथे पाण्याचा मर्यादित वापर करावा लागेल. कदाचित फक्त ओले टिश्यू पेपर वापरावे लागतील. त्यामुळे मला माझ्या सवयींवर नियंत्रण ठेवावं लागेल अस जितेन म्हणतो.
मार्स वन ही डच मोहीमेत मंगळवार मानवी वसाहत उभारण्यात येईल. अर्ज केलेल्या दोन लाख लोकांपैकी ४० जणांना मंगळावर राहण्याचं प्रशिक्षण देण्यात येईल आणि त्यापैकी अवघ्या चौघांनाच प्रत्यक्षात मंगळवारीसाठी नेण्यात येईल.
अंतराळशास्त्रज्ञ सिध्दार्थ मूर्ती हे या मोहीमेचे सल्लागार असून  अर्जदारांना मार्स १ मोहीमेचे अर्थ समजलेच नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केले. सोशल मिडीयावर या मोहीमेवरील चर्चा पाहिल्यास तसे प्रकर्षाने जाणवते. ‘अर्जदारांना मंगळ हे पृथ्वीप्रमाणेच असावे असे वाटते. मात्र तेथील परिस्थिती भिन्न आहे. तिथे जीवसृष्टी नाही. स्त्रोतही मर्यादीत असल्याने तिथे जगणे कठीण असते.
पृथ्वीवरुन मंगळावर कोणतीही जड वस्तू नेता येत नाही. त्यामुळे ही मोहीम सर्वसामान्यांसाठी आव्हानात्मक असेल हे सर्वच अर्जदारांनी लक्षात घ्यावे असे ते सांगतात. मंगळावरील या ‘रिएलिटी शोमध्ये भाग घेण आणि तो पार पाडणे हे कठीण असून यात चौघांचा निभाव कसा लागेल हे सांगण कठीण असल्याचे त्यांनी नमूद केले.
close