‘लंबी जुदाई’ फेम गायिका रेश्मा यांचं निधन

November 3, 2013 11:21 AM0 commentsViews: 269

reshma3 नोव्हेंबर : ‘लंबी जुदाई’ या गाण्याचा आवज आजही सर्वांच्या मनात घुमत आहे, या गाण्याच्या गायिका रेश्मा यांचे आज सकाळी निधन झाले.
त्यांचा मृत्यू घशाच्या कर्करोगामुळे झाला. लाहोरमधल्या हॉसिपटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. हिरो या सिनेमातलं त्यांचं लंबी जुदाई हे गाणं खूपच गाजलं. रेश्मा यांचा जन्म राजस्थानच्या बिकानेरमध्ये झाला होता.
रेश्मा यांच्या निधनामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधले त्यांचे चाहते हळहळले आहेत.

close