सीमाप्रश्नावर कर्नाटकची आडमुठी भूमिका कायम

February 7, 2009 7:27 AM0 commentsViews: 2

7 फेब्रुवारी नागपूरसीमाप्रश्नाबाबत कर्नाटक सरकारची आडमुठी भूमिका कायम आहे. सद्या भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन नागपुरात चालू आहे. सीमा प्रश्नाबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना विचारलं असता, बेळगाव हा कर्नाटकचा अविभाज्य भाग असल्याचा दावा त्यांनी केला. महाजन अहवालाचा हवाला देऊन त्यांनी हे विधान केलं. याबाबत प्रा. एन.डी. पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले, महाजन आयोगाचा निर्णय हा अंतिम निर्णय नाही. कर्नाटकातील सरकार महाजन अहवालाचा हवाला देऊन जो अपप्रचार करत आहेत तो त्यांनी थांबवावा. हे चुकीचं आहे. महाजन आयोग महाराष्ट्राने नाकारला आहे. तसंच आता सीमाप्रश्न न्यायालयात असल्यामुळे कर्नाटक सरकारने याबाबत काहीही बोलणं चुकीचं आहे. येडीयुरप्पाच्या विधानाबद्दल राज्याचे विराधी पक्षनेते रामदास कदम यांना विचारलं असता ते म्हणाले, महाजनआयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नाही. तसंच सीमाप्रश्न सद्या न्यायालयात असल्यामुळे सीमा भागातला प्रदेश केंद्रशासित करावा अशी शिवसेनेची मागणी आहे. याबाबत शिवसेना आमदार निलम गो-हे म्हणाल्या, युतीबद्दल शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेआणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी याआधी आपली भूमिका मांडली आहे. तसंच सेना-भाजप युती हिंदुत्वाच्या मुद्यावरून झाली आहे. सीमाप्रश्नाबाबत महाराष्ट्रातील भाजपही शिवसेनेच्या सोबतच आहे असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

close