उद्या झेपावणार मंगळयान

November 4, 2013 1:20 PM0 commentsViews: 29

4 नोव्हेंबर : भारताच्या मंगळ मोहिमेची तयारी आता पूर्ण होत आली आहे. उद्या दुपारी अडीच वाजता हे यान मंगळाच्या दिशेने प्रयाण करेल. 28 ऑक्टोबरला सुरू होणारी ही मोहीम काही तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता हे सगळे अडथळे आता दूर झाले आहेत. या उपग्रह आणि पीएसएलव्हीवर वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या आहे.

 

मिशन मार्स हा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा प्रकल्प आहे. हे यान मंगळाच्या भोवती एका कक्षेमध्ये फिरेल. यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचं संशोधन केलं जाणार आहे. प्रक्षेपणानंतर साधारण वर्षभरानंतर हा उपग्रह मंगळाच्या जवळ पोहोचेल.

 

पृथ्वीभोवती फिरणार्‍या उपग्राहंप्रमाणेच हा मंगळाच्या कक्षेभोवती फिरणार आहे आणि त्यानंतर तिथून वेगवेगळे प्रयोग करून ही माहिती इस्त्रोला पाठवणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाला तर भारत मार्स क्लब मध्ये जाणारा चौथा देश ठरेल. यामुळेच या लाँच कडे आता सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

close