मुंबईत अल्पवयीन मैत्रिणीवर केला सामूहिक बलात्कार

November 4, 2013 2:39 PM2 commentsViews: 49

Image img_233172_rape345234_240x180.jpg4 नोव्हेंबर : देशभरात उत्साहपूर्ण वातावरणात दिवाळी साजरी केली जात असतानाच मुंबईकरांची दिवाळी उत्सवाला गालबोट लावणारी संतापजनक घटना गोरेगाव येथे घडली.

 

 

एका अल्पवयीन मैत्रिणीला पुजेच्या बहाण्याने घरी बोलवून सहा नराधम मित्रांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असला तरी अद्याप आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

 
गोरेगावमध्ये राहणा-या एका अल्पवयीन मुलीला तिच्या मित्राने पुजेच्या बहाण्याने घरी बोलवले.  ती  दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी गेली होती. पुढे हे दोन मित्र तिला आपल्या अन्य मित्रांकडे घेऊन गेले. रात्री अकराच्या सुमारास घरी सोडण्याच्या निमित्ताने या तरुणीसोबत साधारण सहा तरुण होते. त्यांनी  तिच्यावर जबरदस्ती केली. तिने थांबवण्याचा प्रयत्नही केला मात्र तिचा विरोध नराधमांना थांबवू शकला नाही.

 

रात्री घरी परतल्यावर पिडीत मुलीने आईवडिलांना घडलेला प्रकार सांगितला. यानंतर तिने दिंडोशी पोलिसांकडे सहा जणांविरोधात बलात्कार केल्याची तक्रार नोंदवली आहे.

 • सचिन आहेरकर, सिडको,औरंगाबद

  समाज देव,देश,धर्मा पासुन दुर जात आहे त्याचेच हे लक्षन आहे.
  जो पर्यत आधुनीकते बरोबर नैतिक,मानवीमुल्य,सदाचर शिक्षण येत नाही,
  कुटुंबसंस्था,विवाह्संस्था यांना बळ्कटी येत नाही, विविध समाज,नाते गोते यांचे जाळे संघटीत होत नाही तोपर्यत आधुनिक समाजाचे पतन होतचरहील. स्वैराचार,आत्याचार,भ्रष्ट्रचार,कलियुगाचे राक्षस,मोठेच होणार.
  आधुनिक समाजाला धार्मिक मक्तेदार मनुवाद्याचाही धोका आहे, त्याच प्रमाणे स्री ही लक्ष्मणरेषा ओलाडत आहे.
  भारतात पाश्चातीकरण विद्न्यात,व्यव्हारात असावे,आचरणत नसावे.

 • kishor kamble

  bharat maza desh ahe pan yacha mala abhiman nahi tar laaj vatatey

close