विराट नंबर 1

November 4, 2013 12:35 PM0 commentsViews: 303

Image virat_kohali_300x255.jpg4 नोव्हेंबर :  वन डे क्रिकेट क्रमवारीत भारताच्या विराट कोहलीनं अव्वल स्थान गाठलंय. अशी कामगिरी करणारा तो तिसरा भारतीय बॅट्समन ठरलाय. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वन डे सीरिजमध्ये विराटनं दोन सेंच्युरी झळकावल्या होत्या.

 

पहिली सेंच्युरी त्यानं 52 बॉलमध्ये तर दुसरी सेंच्युरी अवघ्या 66 बॉलमध्ये केली होती. या सीरिजमध्ये त्याचा स्ट्राईकरेटही 80च्यावर होता. याशिवाय टॉप 20 बॅट्समननमध्ये भारताच्या 5 बॅट्समनचा समावेश आहे.

close