मतांसाठी भाजपचा यु टर्न

February 7, 2009 9:49 AM0 commentsViews: 2

7 फेब्रुवारी नागपूरहिंदुत्वाच्या मुद्याला बगल देणा-या भाजपनं केंद्रात सत्तेत आल्यास राममंदिर बांधण्याचं पुन्हा आश्वासन दिलंय. भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. सकाळी पक्षाचे अध्यक्ष राजनाथ सिंह जेष्ठनेते लालकृष्ण अडवाणी, गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि सुषमा स्वराज यांनी हेडगेवार स्मृती स्थळ आणि दीक्षा भूमीला भेट दिली. दरम्यान पक्षाच्या कार्यकारणीच्या बैठकीत पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी पक्षाच्या भविष्यातील वाटचाली बद्दल कार्यकारणीच्या सदस्यांशी चर्चा केली. या बैठकीत पक्षाचे देशभरातील आमदार खासदार मंत्री तसंच मुख्यंत्रीही उपस्थित राहणार आहेत. या बैठकीनंतर संध्याकाळी यंशवत स्टेडीयमवर अडवाणी आणि राजनाथ सिंह यांची जाहीर सभा होणार आहे.

close